खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथे चाकरमान्यांच्या इको गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात इकोमधील 5 जण जखमी झाले असून त्यांना कलंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालक हनुमंत कृष्णा कोंडविलकर (वय ३२, रा. कुडोशी ता. खेड), ऋतुजा हनुमंत कोंडविलकर (वय १२ वर्ष, रा. कुडोशी) , रिया हनुमंत कोंडविलकर (वय ३१ वर्ष, रा. कुडोशी) , रियान हनुमंत कोंडविलकर (वय ५ वर्ष रा. कुडोशी), राजाराम तुकाराम पवार (वय ७०, रा. वरवली ता. खेड) , राजश्री राजाराम पवार (वय ६१, रा. वरवली ), शुभम शिवाजी जाधव (वय २७ वर्ष, रा. हुंबरी, ता. खेड) हे प्रवास करत होते. यातील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.