खेड:- खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्याजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात डंपर चालकाने एसटीला घासत दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
संकेत सुभाष जगताप (२६), सोनाली संकेत जगताप (२४, दोघे रा. शेल्डी-गावठाण, खेड) अशी जखमींची नावे आहेत. एसटी चालक रमेश कामेटे (४४, रा. शिक्षक वसाहत, भरणे) हे एसटी (एमएच २० बीएल २५८०) घेवून खेड ते दापोली रस्त्याने जात होते. याचदरम्यान, दापोली बाजूकडून येणाऱ्या डंपरने (एमएच ०८ डब्ल्यू ८२०५) बसला घासत समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात संकेत जगताप, सोनाली जगताप जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले. दुचाकीस्वाराने डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिसेच्या दिशेने पळाला. दुचाकीस्वाराने डंपरचालकाचा पाठलाग केला असता डंपर क्रमांकावरून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.









