कोकण रेल्वे मार्ग पूर्ववत; रेल्वे पुन्हा ट्रॅकवर

रत्नागिरी:- वाशिष्ठी नदीचे पाणी ओसारल्यानं कोकण रेल्वे पुन्हा सुरु झाली. शनिवारी सकाळी पावणेचार वाजता ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री करुन वाहतूक पुन्हा सुरू झाली.

कोकण रेल्वेच्या अभियंते कामगारांनी भर पावसात सलग काही तास रात्रभर काम करत मार्ग पूर्ववत केला आहे. शनिवारी सकाळी राजधानी एक्सप्रेस डाऊन या मार्गवरून रवाना झाली.

कोकण रेल्वे मार्ग पूर्ववत झाला असला तरी या मार्गावर सध्या ट्रेन नाही आहेत. केवळ मार्ग पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. लवकरच कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची घोषणा होईल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.