उदय सामंत; अधिकाऱ्यांचे काम कौतूकास्पद, जलजिवन मिशमध्ये मागे
रत्नागिरी:- जिल्हा हा केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजनेंतर्गत येणाऱ्या 13 योजनांमध्ये अग्रेसर आहे. या योजनांची प्रभावी अमलबजावणी केली तर जिल्हा प्रथम क्रमांकावर येईल, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. जिल्हयातील या योजनांसंदर्भातील कामकाजाबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज जिल्हाधिकारी सभागृह येथे केंद्र पुरस्कृत फ्लॅगशिप योजना तसेचजिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना,महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, स्वामिनी योजना, प्रधानमंत्रीपथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांचा आढावा घेतला. यामध्ये सर्व योजणांचे काम उत्तम सुरू आहे.राज्यामध्ये जिल्हा पहिल्या पाच क्रमांकावर आहे. याचे सर्व श्रेय अधिकाऱ्यांना जाते. कोणताही पाठपुरावा न करता एवढे उत्तम कामअधिकाऱ्यांनी केले आहे. परंतु पुढील तीन महिने आम्ही मिशन म्हणून या योजनांचे काम करून जिल्हा अजून कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्नअसणार आहे. जलजीवन मिशन योजनेमध्ये जिल्हा मागे आहे. जिल्ह्यासाठी १ हजार ४७५ पाणी योजना मंजूर करण्याचा निर्णय आम्ही आजघेतला. या योजनेलाही गती देण्याचा प्रयत्न आहे.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठकसंपन्न झाली. बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलकरिता नवीन कुस्ती मॅट खरेदी, व्यायामशाळेसाठी नवीन अद्यावत व्यायाम साहित्य खरेदी,व्यायामशाळा भाडेतत्वावर चालविण्यास देणे आदि विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.









