कुरतडे भाटकरकोंड ते टिके भाताडेवाडी पुलासाठी पाच कोटींचा निधी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरमार्गे किरबाग ते हातीस अशा गावांना जोडणार्‍या काजळी नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना या भागातील कुरतडे भाटकरकोंड ते टिके भाताडेवाडी दरम्यान काजळी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.

रत्नागिरी तालुक्यातही अनेक छोट्या आणि मोठ्या पुलीं कामे गतीने सुरू आहेत. कुरतडे भाटकरकोंड ते टिके भाताडेवाडी दरम्यान काजळी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे. नाबार्डमधून या मोठ्या पुली उभारणी केली जात आहे. त्यावर 5 कोटी 13 लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. या पुलाची लांबी 40 मीटर इतकी असून दोन गाळे व 7.5 मीटर रुंदी असे बांधकाम केले जात आहे.

या पुलामुळे कुरतडे भाटकरकोंड ते टिके भाताडेवाडी यांच्यामधील अंतर आता कमी होणार आहे. रत्नागिरी-कुरतडे या दरम्यानच्या मार्गावरील अंतरही या पुलामुळे कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक पुलांची कामे गतिमान झाली आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये तब्बल 173 कोटी 11 लाखाच्या निधीतून 81 पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत.