कुणबी समाजाचे नेते, पं. स. चे माजी उपसभापती सुनील नावले यांचे निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच संजय गांधी निराधार योजनेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुनील नावले यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. येथील विविध सामाजिक कार्य, संघटन कार्यात सदैव अग्रणी असणारे हे व्यक्तीमत्व अचानक हरपल्याने सर्वांच्या मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील पावस दशक्रोशीत सुनील गोपाळ नावले (वय सुमारे 50) रा. नाळ-पावस हे सर्वपरिचित होते. एक सुस्वभावी, साधी राहणी असे हे व्यक्तीमत्व होते. कुणबी समाज संघटन असो किंवा येथील विविध सामाजिक कार्यात ते सदैव अग्रणी होते. सामाजिक कार्याबरोबरच राजकीय क्षेत्रात ते सद्या क्रियाशील होते. सोमवारी सकाळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्यावतीने ते ओबीसी आरक्षणाबावत आंदोलनातही अग्रणी सहभागी होते. हे आंदोलन आटोपून ते आपल्या रत्नागिरीतील निवासस्थानी गेलेले होते. दरम्यान येथील संघटनोचे पदाधिकारी यांच्याशी सामाजिक कार्याबाबत यादिवशी वारंवार संवाद साधून राहिले होते.

यादिवशी दुपारी निवासस्थानी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते तपासणीसाठी रिक्षाने रुग्णालयात येत होते. यादरम्यान ते अत्यवस्थ झाल्याने रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. पण त्यावेळी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले. त्यांच्या निधनाची खबर लगोलग समाजातील पदाधिकाऱ्यांच्या कानावर गेली. लागोलाग सर्वांनी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे धाव घेतली. नावले यांया निधनाच्या या घटनेने साऱ्यांना धक्का बसला. सोमवारी आंदोलनादरम्यान सर्वांशी संवाद साधून असलेला सहकारी अचानक गमावल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

सुनील नावले यांनी मागील काळात रत्नागिरी पंचायत समितो उपसभापती पद भूषवले होते. पालकमंत्री उदय सामंत यों निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. संजय गांधी निराधार योजनेसाठी रत्नागिरी तालुक्याच्या समितीवर पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने त्यांची 2023 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीची तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या पहिल्या सभेत त्यांनी एकूण 183 अर्जांना मंजुरी दिली होती. समाजातील गरजू, उपेक्षित घटनांना त्या माध्यमातून न्याय देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गरजू व्यक्तींना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले होते. एक आंबा बागायतदार म्हणूनही त्यांची ख्याती होती. अशा या समाजनेते, सामाजिक कार्यकर्त्यांच्या निधनाने साऱ्यांना हळहळ व्यक्त केली आहे. त्यांया पश्चात पत्नी, दोन मुली, भाउ असा परिवार आहे.