रत्नागिरी:- काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रविवार १६ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल होतील. सकाळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी व नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. सकाळी ११ वाजता याच ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद होईल. यानंतर ते काँग्रेस भवन येथे प्रस्थान करतील. साडे अकरा वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहतील. दुपारी तीन ते पाच या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी ते घेणार असल्याचे कळवण्यात आले आहे.