कशेडी घाटात 30 फूट खोल दरीत कोसळली कार

खेड:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूणहून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार २५-३० फूट खोल दरीत कोसळली. दगडावर अडकलेल्या गाडीतून एक-एक प्रवाशांनी काळोखातून गाडीतून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला.

 कार चालक स्वप्निल सुधीर जाधव  (34 रा. डोंबिवली) कार घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्याचा कारवरचा ताबा सुटल्याने कार 25 ते 30 फुट खोल दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये कार चालक सुदैवाने बचावला. अपघात घडल्याची माहीती मिळताच मृत्यूंजय देवदुत समीर मोरे, महेश रांगोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोंडकर, बोरकर, पोलीस हवालदार रामाकडे, पोलीस नाईक मादळकर आदि अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील कार चालकाला बाहेर काढण्यास मदत केली.