रत्नागिरी:- तालुक्यातील फणसवळे येथे भाजी व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद कृष्णा आंब्रे (वय ४२, रा. भक्तीकुंज, एमआयडीसी रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेअकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत त्यांचा भाऊ प्रेमानंद आंब्रे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यांचा भाऊ प्रमोद आंब्रे हा भाजीचा व्यवसाय करायचा. भाजी व्यवसायात कर्ज झाल्याने प्रमोदने फणसवळे येथील जंगलमय भागात एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी खबर मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात आणला. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









