रत्नागिरी:- जेसीबी चोला मंडल या फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास दिल्याने राजापूर तालुक्यातील हसोळ सौंदळ येथिल अजीम कादर नाईक याने गवत मारण्याचे औषध घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याच्या भावाने फिर्याद केल्यावर दिनेश बाबर, अनिरूद्ध माने व सामे अशा तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजापूर पोलीस स्थानकात रियाज नाईक यांनी फिर्याद दाखल केली. असून फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ अजीम नाईक याने जेसीबी छोला मंडळ या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे तीन हप्ते राहिले होते तीन हप्ते भरण्याबाबत कोणतीही कायदेशीर नोटीस न देता किंवा कोणत्याही कायदेशीर मार्ग न अवलंबता उलट सुलट बोलून मानसिक त्रास देऊन हप्त्याची रक्कम भरण्याकरिता जबरदस्ती करून चोलामंडल कंपनीचे अधिकारी यांनी अझीम याला तत्काळ हप्ते भरण्याबाबत तगादा लावल्याने त्याने गवत मारण्याचे औषध पिऊन आपले जीवन संपविले. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून तिघा अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.