रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथे दारुच्या नशेत वृध्दाने राहत्या घरासमोरील अंगणात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 वा.सुमारास निदर्शनास आली.
गजानन तुकाराम पवार (60, रा.करबुडे पवार कोंड, रत्नागिरी) आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. गजानन पवार यांना दारुचे अतिव्यसन होते. त्यांच्या पत्नीचे 15 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी गजानन पवार यांनी राहत्या घरासमोरील अंगणात असलेल्या छपराच्या लोखंडी पोलाला इलेक्ट्रिक वायर बांधून गळफास घेतला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.