कदम फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन 

रत्नागिरी:-कदम फाउंडेशन अपेडे संस्थेतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार असून 18 जून पर्यंत चित्राचा फोटो गुगल फॉर्म किंवा व्हाट्स अँप वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिला गट 7 वर्षापर्यंत असून या गटासाठी झाडे, फुले, फळे किंवा निसर्ग चित्र हा विषय देण्यात आला आहे. दुसरा गट आठ ते अकरा वर्षे मुलांसाठी असणार आहे. या गटासाठी अशी असावी बाग किंवा माझा आवडता ऋतू हा विषय देण्यात आला आहे. तिसरा गट 12 ते 15 वर्षे मुलांसाठी ठेवण्यात आला आहे. या गटासाठी विषय निसर्ग आपला मित्र किंवा माझ्या स्वप्नातील गाव देण्यात आला आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या गटानुसार विषय निवडून चित्र काढावे. चित्र कोणत्याही माध्यमात रंगवले तरी चालेल आणि कोणत्याही कोऱ्या कागदावर चित्र काढा. चित्र स्वतः काढलेले असावे, प्रत्येक गटातूनतीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. 18 जून 2021 पर्यंत चित्राचा फोटो गुगल फॉर्म किंवा व्हाट्सअप वर पाठवा आणि सोबत आपली पूर्ण माहिती द्यावी. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र तसेच प्रथम क्रमांक विजेत्याला 1000 /-रु, द्वितीय 700/-रुपये,  तृतीय 500/- रुपये अशी बक्षिसे असतील.

या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक 9623493049  (फक्त व्हाट्सअप ) गुगल फॉर्मसाठी https://forms.gle/RjwQWdYEhPNkdDbD6 या लिंक वर जावे असे आवाहन करण्यात आले आहे.