ओबीसींना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे सरकारचे कुटील कारस्थान: चित्रा वाघ

रत्नागिरी:- ओबीसींना मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे कुटील कारस्थान या सरकारचं चाललेलं आहे.ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं हे फक्त आणि फक्त सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. इंपेरीकल डाटा जर तयार केला गेला असता, तर आरक्षण टिकलं असतं. मात्र सरकारनं तस केलं नाही.

14 महिने मागासवर्ग आयोग गठीत करण्याची जी फाईल होती, ती मुख्यमंत्र्यांकडे 14 महिने धूळखात पडलेली होती, अशी माहिती आमच्याकडे आलेली होती. तुम्ही आज सत्तेमध्ये आहात, सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी एकत्र येत तात्काळ मागावर्गीय आयोग गठीत करायला हवा होता, आणि इंपेरिकल डाटा बनवायला हवा होता. ते झालं नाही, त्यामुळेच मराठा आरक्षणासारखंच काम ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं माती करायचं काम या सरकारने केलं आहे. त्याचबरोबर भाजपकडून 1000 ठिकाणी चक्काजाम करण्यात येणार असल्याचं चित्रा वाघ यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत  म्हटले आहे.