एसटीचे चाक पायावरुन गेल्याने एसटी मॅकेनिक जखमी

रत्नागिरी:- एसटी महामंडळाच्या टिआरपी येथील कार्यशाळेत मॅकेनिकचे काम करणाऱ्या मॅकेनिकच्या पायावरुन एसटीचे चाक गेल्याने जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विकास शंकर चव्हाण (वय ४५, रा. संगमेश्वर) असे जखमी एसटी मॅकेनिकचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १) दुपारी अडीच च्या सुमारास टिआरपी येथील मॅकेनिक कार्यशाळेत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास चव्हाण हे गाडीचे काम करत असताना अचानक त्यांच्या पायावरुन चाक गेले. त्यात ते जखमी झाले. तत्काळ त्यांना इतर सहकाऱ्यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.