रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील गडनदी पुलाजवळ एसटी चालक व वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या 5 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मारहाणीची घटना 10 सप्टेंबर 2013 रोजी घडली होती. चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार संगमेश्वर पोलिसांनी संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.
रमेश सिताराम काळंबे (26, रा. राजीवली संगमेश्वर), प्रवीण वासुदेव पेढामकर (21, रा. कुटरे, खैरेवाडी चिपळूण) गणेश दत्ताराम कदम (21, रा. धामणदेवी, रायगड), स्वप्निल सुनिल कदम (20,रा. कुटरे खैरेवाडी, चिपळूण) आणि शैलेश सुभाष पंदेरे (22, रा. पुणे) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत.