रत्नागिरी : जुना माळ नाका येथून बोर्डिंग रोडकडे जाणाऱ्या नगरपालिकेच्या जलवाहिनीच्या चावीवरच एका इसमाने चार चाकी गाडी उभी केली. गाडी उभी असल्याने चावी देता येणे शक्य नसल्याने बोर्डिंग रोड भागात मंगळवारी पाणी पुरवठा ठप्प होता.
मंगळवारी ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली. बेशिस्त पार्किंगचा फटका बोर्डिंग रोड भागातील नागरिकांना बसला. जलवाहिनीच्या चावीवर गाडी पार्क करण्यात आली. यामुळे बोर्डिंग रोड भागात पाणी सोडता आले नाही.