उभ्या बसला धडक दिल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा 

चिपळूण:- चिपळुणातील गुळवणे- उगवतवाडी येथे उभ्या असलेल्या बसला कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 4.30 वा.घडली. या पकरणी कार चालकावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतिक प्रदीप आयरे (गुळवणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याची फिर्याद माधव बाबूराव दहीफळे (37, सध्या चिपळूण, मुळ लातूर) यांनी दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव दहीफळे बुधवारी सायंकाळी 4.30 वा. ते गुळवणे-चिपळूण बसगाडी आगाराकडे घेऊन येत असताना गुळवणे-उगवतेवाडी एसटी थांब्याच्या पुढे 100 मिटरवर समोरुन कार आली. रस्ता अरुंद असल्याने त्यांनी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. मात्र कारचालक प्रतिक आयरे याने कार उतारात बेदरकारपणे चालवून एसटी बसला समोरुन ठोकर दिली. यात एसटीसह कारचे नुकसान झाले.