उद्यमनगर येथे वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला इलेक्ट्रिक पंपाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवार 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वा.सुमारास घडली.
मिथून चंदू खेत्री (34, रा.उद्यमनगर, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो भंगाराचा व्यवसाय करायचा.

रविवारी दुपारी राहत्या घराजवळ इलेक्ट्रिक पंप पाण्यात टाकत असताना त्याचा विजेचा जोरदार शॉक लागला. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी मिथूनला तपासून मृत घोषित केले. याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.