खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस कंपनीच्या इमारतीचे बांधकाम करत असताना तोल जावून जमिनीवर कोसळलेल्या इजाज अहमद (२५, सध्या रा. लोटे, मूळ गाव-पश्चिम बंगाल) या कामगाराचा मृत्यू झाला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आरसीसी वाकवण्याचे काम करत असताना तोल गेल्याने २० फुटावरून जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता त्याला मृत घोषित केले.