आलीमवाडी जागा खरेदीबाबत उच्च न्यायालयात दाद: मिलिंद कीर 

रत्नागिरी:- शहरातील आलीमवाडी येथील साडे तीन गुंठे जागा १ कोटी २७ लाख या अवाजवी किमतीत पालिकेने खरेदी केली आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान करणारी ही बाब आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे ३०८ खाली याबाबत तक्रार केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरण पडताळून तेव्हाच फेटाळायला हवे होते. मात्र दीड वर्षे यावर सुनावणी घेऊन यावर निकाल न देता हे प्रकरण पुन्हा फेटाळले.
जिल्हाधिकारी आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत याचे वाईट वाटते. त्यामुळे जिल्ह्याचे आणि लोकशाहीचे काही खरे नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते. ते म्हणाले, शहरातील सुधारित नळपाणी योजनेमधील आलीमवाडी येथे पालिकेने साडे तीन गुठे जागा खरेदी केली. माळरानातील या जागेला गुंठा तीन लाख देखील किंमत नाही, तरी १ कोटी २७ लाखाला ही जागा खरेदी करण्यात आली आहे. खडकमोहल्ला आणि पंधरामाड येथे पाणी पुरवठा व्हावा, यासाठी आलीमवाडीतील या जागेवर साठवण टाकी बांधण्यात येणार आहे. मात्र तेथून पुन्हा चार किमीची जलवाहिनी टाकुन पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च सुमारे ३ कोटी आहे. दोन्ही खर्च मिळून पालिकेवर सुमारे ४ कोटीचा बोजा यामुळे पडला आहे.

आलीमवाडीतील जागे एवजे शासकी जागा किंवा एमआयडीसीची जागा मोफत किंवा नाममात्र भाडेतत्वावर घेतला आली असती तरी ती जागा सोडून ही आवाच्या सव्वा किमीतीमध्ये खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान आहे. हा जनतेचा पैसा असून सत्ताधाऱ्याच्या स्वार्थासाठी हा व्यवहार करण्यात आला आहे. तो रद्द व्हावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे ३०८ खाली तक्रार दाखल केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी तेव्हा प्रकरण फेटाळले असते तर ते योग्य होते. मात्र दीड वर्षे प्रकरण चालविले त्यावर सुनावणी झाल्यानंतर निर्णय माझ्या बाजूने किंवा विरोधात द्यायला हवा होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कर्तव्य न बजावता प्रकरण फेटाळल्याने वाईट वाटले. तत्काळ जिल्हाधिकारी मिश्रा परवडेल, असे म्हणावे लागले. जिल्हाधिकारी आम्हाला न्याय देऊ शकले नाहीत. त्या आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका
दाखल करून न्याय मागणार आहोत.