रत्नागिरी:- गुरुवारी रत्नागिरीत जिल्ह्यात ६४ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चिंता अधिक वाढली आहे. असे असताना माळनाका येथील एका शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. शिक्षक कोरोना बाधित आढळल्याने शाळा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरातील जुना माळनाका येथील एका शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शाळा ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शालेय प्रशासनाने घेतला असून त्यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना कळविण्यात आली आहे. या शाळेतील मुले डेरवण येथे क्रीडा स्पर्धेसाठी जाणार होती. स्पर्धेच्या नियमानुसार सोबत जाणाऱ्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक होते. यानुसार येथील शिक्षकाने कोरोना टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा अहवाल येताच शाळा तातडीने सोडण्यात येऊन तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.









