Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी आठवडा बाजार येथे दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

आठवडा बाजार येथे दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथे खरेदीसाठी आलेल्या पादचारी वृद्धाला अज्ञात महिला दुचाकी स्वाराने धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अनंत तानाजी सनगरे (वय ६५, रा. फणसवळे, रत्नागिरी) असे गंभीर जखमी वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २) रात्री आठच्या सुमारास शहरी बसस्थानक समोरील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार जखमी वृद्ध अनंत सनगरे हे शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारात खरेदीसाठी आले होते. सायंकाळी खरेदी करुन एसटीसाठी बसस्थानक येथे येत असताना बसस्थानक समोर रस्त्यावर अज्ञात महिला दुचाकी स्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिला स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.