आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- साखर आंबेरवाडी (ता. राजापूर) येथे लहानपणापासून फिट येण्याच्या आजाराला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुपेश कृष्णा राड्ये (३२, रा. साखर आंबेरकोनीवाडी, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास साखर आंबेरवाडी येथील राहत्या घराच्या मागील पडवित घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार रुपेश याला लहानपणापासून फिट येण्याचे आजारपण होते. आजारपणाला कंटाळून त्याने घरात कुणीही नसल्याचे पाहून स्वतः हुन नायलॉन रस्सी घराचे मागील पडवित छताचे लोखंडी वाशाला रस्सी बांधून गळफास घेतला.