आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी विजयाचा निर्धार: नंदकुमार मोहीते

रत्नागिरी:- आगामी सर्व निवडणुकीमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात 85 टक्के असलेल्या ओबीसींमधुनच लोकप्रतिनीधी निवडुन आणण्याचा निर्धार ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोहीते यांनी व्यक्त केला. तसेच ओबीसींवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी यावेळी करण्यात आली.

रत्नागिरी तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीची बैठक तेली समाज कार्यालयात झाली. यावेळी
ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसींचे आरक्षण कायम राहिले पाहिजे यासाठी रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. तालुक्याचे चार विभाग करुन गावागावात जाण्यासाठी विभागवार कमिटी तयार करण्यात आल्या. ओबीसींच्या मागण्यांचे बॅनर गावोगावी तयार करुन लावण्याचे ठरविण्यात आले. ओबीसींवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवण्यात आली. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्व ओबीसी बांधवांना अ‍ॅड. महेंद्र मांडवकर यांनी जामीन मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
रत्नागिरी शहरात 26, 27, 28 जानेवारीला प्रभागवार बैठका आयोजीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी रघुवीर शेलार, मुन्ना चवंडे, राजीव कीर, शरयु गोताड, दादा ढेकणे, सुरेंद्र घुडे, रुपेंद्र शिवलकर, सलील डाफळे, बाबा नागवेकर, नितीन तळेकर, बंटी कीर, निलचंद्र साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 50 सभा ग्रामिण भागामध्ये ओबीसींचा झंझावात निर्माण केला जाणार आहे. यावेळी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचीव धनंजन शिंदे यांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला पाठिंब्याचे पत्र अध्यक्ष मोहीते यांच्याकडे देण्यात आले.
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष बावाशेठ साळवी, महिला तालुका अध्यक्षा सौ. साक्षी रावणंग, तालुका उपाध्यक्ष राजीव कीर, दिपक राऊत, शहर अध्यक्ष मुन्ना चवंडे, सौ. शरयु गोताड, रघुवीर शेलार, रुपेंद्र शिवलकर यांच्यासह अनेक ओबीसी बंधु भगिनी उपस्थित होते.