रत्नागिरी:-सालाबादप्रमाणे यावर्षी आंबेशेत घोसाळेवाडी येथे पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 25 मार्च रोजी पालखी नृत्य स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती शेखर घोसाळे यांनी दिली.
दरवर्षी शिमगोत्सवात ठिकठिकाणी पालखी नृत्य स्पर्धा होत असतात. शहरानजिकच्या आंबेशेत येथे अशाच प्रकारची भव्य-दिव्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावेळी 25 मार्च रोजी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी रोख रकमेसह आकर्षक चषक दिला जाणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट पालखी नाचवणार्या संघास आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 21 हजार व चषक द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 15 हजार रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 11 हजार रुपये आणि चषक अशी बक्षिसे जाहीर केली आहेत.
इच्छुक संघांनी आपल्या संघाच्या नाव नोंदणीसाठी खालील व्यक्तींशी अनिल घोसाळे 9421603603, शेखर घोसाळे 9561408256, अमित घोसाळे 9356008616, आशिष घोसाळे 9421188800, प्रियेश झापडेकर 9975076605 संपर्क साधावा असे आवाहन शेखर घोसाळे यांनी केले आहे.