लांजा:- गॅस वाहतूक करणारा कंटेनर टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदीत कोसळला. या भीषण अपघातात टँकर चालकाचा टँकर खाली अडकून पाण्याखाली बुडून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २.४८ वाजण्याच्या दरम्याने घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गोव्याच्या दिशेने जाणारा एम एच बारा एलटी ६४८८ हा गॅस वाहतूक करणारा कंटेनर टॅंकर गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी गोव्याच्या दिशेने जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील पुलाचा कठडा तोडून हा कंटेनर थेट काजळी नदी जाऊन कोसळला. या भीषण अपघातामध्ये चालक हा कंटेनर खाली अडकून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे महामार्ग वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक श्री घोसाळे, पोलीस हवालदार पावसकर, पोलीस हवालदार श्री पवार ,श्री भरणकर, श्री संसारे याबरोबरच हॅन इन्फ्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी आणि श्यामकुमार गिरी, क्रेन घटनास्थळी दाखल झाले. टॅंकरखाली अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी लांजा वाहतूक पोलिस श्री.मुजावर, लांजातील तरुण रणजित सार्दळ तसेच महामार्ग वाहतुक पोलिस यांनी प्रयत्न केले. त्यानंतर ट्रेनच्या सहाय्याने सायंकाळी ४.३० वाजता टॅंकर बाजुला करुन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
नदीत पडल्याने या गॅस टँकरला पाठीमागून गळती सुरू झाली होती. त्यामुळे या ठिकाणी संबंधित सुरक्षा अधिकारी दाखल झाले होते. तर सुरक्षिततेबाबत मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती.









