लांजा:- गुजरातहून गोव्याच्या दिशेने जाणारा १६ चाकी ट्रक आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल होऊन थेट काजळी नदीत पडता पडता वाचला. या भीषण अपघातात सुदैवाने ट्रक चालक आणि क्लिनर बचावले आहेत. हा अपघात सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारास आंजणारी पुल येथे घडला.
घटनास्थळावरून मिळालेला माहितीनुसार, गुजरातहून गोव्याच्या दिशेने जाणारा (जिजे 37 टी- 6322 ) या क्रमांकाचा ट्रक आंजणारी घाटातील तीव्र उतार उतरत असताना ट्रकचे ब्रेक फेल झाले त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक भरधाव वेगाने आंजणारी पुलाचा कठडा तोडून थेट खाली कोसळला. या अपघात होत असताना त्याने येथील दत्त मंदिराची कमान देखील तोडली. त्यानंतर हा ट्रक काजळी नदी जाता जाता थोडक्यात वाचला आहे.
दरम्यान, या अपघातात ट्रकचे चालक व क्लिनर बालंबाल बचावळे आहेत. यामध्ये क्लीनरच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या दोघांना तात्काळ पाली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.