लांजा:- तालुक्यातील जावळे रोड येथे १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने अवघ्या साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळे रोड येथील एका फार्म हाऊस जवळ गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. गुरुवारी दुपारी काही मुले त्या फार्म हाऊसजवळ खेळत असताना या १२ वर्षाच्या मुलाने या बालिकेला सोबत नेऊन हे दुष्कृत्य केले आहे. गुरुवारी रात्री या बालिकेच्या पालकांना हि गोष्ट लक्षात आल्यानंतर या प्रकरणी लांजा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर मुलग्याला ताब्यात घेण्यात आले आहे.