अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या अलावा-जाकिमिऱ्या येथील महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

भाग्यश्री रमेश मयेकर (वय ५४, रा. अलावा, जाकिमिऱ्या, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २४) दुपारी पावणेदोनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. भाग्यश्री मयेकर यांना रात्री श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.