Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली

अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची कोल्हापूर येथे बदली

सुधारित पदस्थापनेव्दारे गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नती

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची आता गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उप आयुक्त,राज्य गुप्तवार्ता विभागात बदली करण्यात आली होती. परंतू आता सुधारित पदस्थापनेव्दारे त्यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी येथे अपर पोलिस अधिक्षकपदी गेली अडीच ते तीन वर्ष कार्यभार सांभाळला. यात त्यांनी बारसू प्रकल्प तसेच इतर बंदोबस्तात चोख कामगिरी पार पाडली होती.