रत्नागिरी:- महाविरणकडुन बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला विरोध असताना जिल्ह्यात या मीटरसाठी आवश्यक असलेल्या बीएसएनएनएलची रेंज (नेटवर्क) नसल्याने अनेक गावामध्ये मीटर बसवण्याच काम बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे सहा हजार मीटर बसविण्यात आले आहेत. परंतु काही गावांमध्ये नेटवर्क नसल्याने डिझिटल डेटा मिळत नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीएसएनएल कंपनीच्या १०४ टॉवरना विद्युत जोडणी द्यावी, यासाठी महावितरणकडे प्रस्ताव दिला आहे. महावितरण कंपनी त्यासाठी सकारात्मक आहे. परंतु अनेक ठिकाणी बीएसएनएलच्या टॉवरचा ढाच्या (स्ट्रक्चर) उभे नसल्याने जोडणीचे काम रखडल्याचे महावितरणकडुन सांगण्यात आले.
जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आदानी ग्रुपची एजन्सी नेमण्यात आली आहे. राज्यात महावितरणकडुन सर्वंत्र ही मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट मीटर ही मोबाईल रिचार्ज करतो त्या प्रमाणे पोस्टपेड असणार आहे. तुम्ही मारलेल्या रिचार्ज संपला की तुमचा विद्युत पुरवठा बंद होणार आहे. परंतु या नव्या योजनेला जिल्ह्यातील अनेक भागातुन विरोध झाला. शिवसनेसह अनेक पक्षानी त्यासाठी स्थानिक ग्राहकांना पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या काम मंदावले. सुरवातील शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि एजन्सींनी ही मीटर बसविण्यात आली. हळुहळु आता जिल्ह्यात सर्वत्र मीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु अजुनही त्याला विरोध होत आहे. गेल्या आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याविरोधात महावितरण कंपनीवर धडकली होती. याबाबतचा आढावा घेतला असता वेगळीच वस्तुस्थितीत पुढे आली आहे.
स्मार्ट मीटरला एक सिमकार्ड आहे. त्यामुळे या मीटरचा ऑनलाईन डेटा महावितरण कंपनीकडे जातो. त्यावरून संबंधित ग्राहकाने किती वीज वापर केला, त्याला किती बील आले हे समजते. ज्या ठिकाणी बीएसएनएलचे नेटवर्क आहे. त्या ठिकाण ही मीटर बसविण्यात येत आहेत. हे काम वेगाने सुरू असताना या कामात आता अडथळा आला आहे तो नेटवर्कचा. आतापर्यंत सुमारे सहा हजार मीटर बसविण्यात आली आहेत. परंतु ज्या ठिकाणी रेंज नाही,त्या ठिकाणी महावितरण कंपनीला पुन्हा घरोघरी जाऊन रिडिंग घ्यावे लागत आहे. डबल काम होत असल्याने ज्या गावांमध्ये नेटवर्क नाही. त्या गावांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबविण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १०४ टॉवरना विद्युत जोडणी मिळण्यासाठी बीएसएनएल कंपनीने प्रस्ताव दिला आहे.









