Sunday, August 2, 2026
spot_img
Home राजापूर अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार

अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार

राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

कौस्तुभ विजय कुरुप (वय 30 रा. लांजा) हे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन अनुस्कुरा घाटात तपास चालू केला असता कौस्तुभ विजय कुरुपचे मृत शरीर रस्त्याच्या दीडशे फूट दरीत व गाडी जवळपास 400 फुटावर आढळले. सदर ठिकाणी लांजा पोलिस निरीक्षक श्री बगळे तसेच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव व त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाली असून पुढील तपास चालू आहे.