रत्नागिरी:- आंबा हंगामामध्ये नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये अक्षय्य तृतीयेला आंबा आवकचा विक्रम होत असतो. अक्षय्य तृतीयेमुळे तेथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची मोठी आवक वाढली आहे. बुधवारी 1 लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली होती. त्यामध्ये कोकणातून 47 हजार व इतर राज्यांतून 53 हजार पेटय़ांची आवक झाली. अक्षयतृतीयाया मूहूर्तावर कोकणातून 70 ते 80 हजार हापूस आंबा पेटय़ा नवी मुंबईच्या मार्केटला जातील, असा अंदाज येथील आंबा बागायतदारांतून वर्तवला गेला आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी 1 लाख हापूस आंब्याची पेटी बाजार समितीत आवक झाली होती. त्यामध्ये कोकणातून 47 हजार तसेच इतर महाराष्ट्रतून 53 हजार पेटय़ांची आवक झाली होती. आंबा हंगामामध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्ताला विशेष मुहूर्त आहे. गेल्या गुढीपाडव्यापासून आंबा मोठय़ा प्रमाणात बाजारात विक्रीसाठी गेला आहे. आंबा पेटो दर 1 नंबराया 60 फळांची पेटी आजही 2200 ते 2300 दराने इतक्या दराने विक्रीस मिळत आहे. अक्षय्य तृतीयेला आंबा आवकचा विक्रम होतो. त्या मूहूर्तावर गेल्या मंगळवारी 1 लाख 13 हजार व बुधवारी 1 लाख 1 हजार पेटय़ा आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. त्यामध्ये कोकणातून 47,303 पेटय़ा हापूस आंबा विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे. दक्षिणेतील राज्यांमधून 53,842 पेटय़ा आंबा विक्रीसाठी आला आहे.
अक्षय्य तृतीयेमुळे आंब्याची चांगली आवक होत आहे. हापूससह दक्षिणेकडील राज्यातून आंब्याची आवक होत आहे. बाजारभावही नियंत्रणात असल्यो बागायतदारांतून सांगितले जात आहे. गुरुवारी कोकणातून 70 ते 80 हजार हापूस आंबा पेटय़ा नवी मुंबईच्या मार्केटला जातील असा अंदाज बागायतदारांनी वर्तवला आहे. कारण उद्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात आंब्याची मागणी आहे. रत्नागिरी हापूसची मागणी सद्या वाढलेली आहे. अक्षय्य तृतीयेला हापूसचा गोडवा आणखीन वाढेल असे बोलले जात आहे.









