जिल्ह्यात 24 तासात 25 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी दोन रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 269 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात आणखी दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 350 बळी घेतले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 25 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 572 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 269 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 72 हजार 134 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 9 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 93 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोन रुग्णांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 350 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.99 टक्के आहे.