कोरोनावरील लसीचा पहिला डोस डॉ. सई धुरी यांना

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी कोरोनावरील लसीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 100 कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाला लस देण्यात येणार आहे. कोव्हीड लसीचा पहिला डोस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सई धुरी यांना देण्यात आला.
     

यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कमलापूरकर, आरोग्य सभापती बाबू म्हाप , व इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दर दोन तासाला 25 जणांना लस देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 5 सेंटर सुरू करण्यात आले असून प्रत्येक सेंटर 100 आरोग्य स्टाफ ला लस देण्यात येईल. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ऑनलाईनद्वारे माहिती देताना शुभेच्छा दिल्या.