जिल्ह्यात 24 तासात 8 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 148 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एकही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नसून पर्यंत कोरोनाने 339 बळी घेतले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 8 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 375 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 148 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 63 हजार 510 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 21 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 917 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकही बळी घेतलेला नाही. यामुळे  जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 339 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.11 टक्के आहे.