रत्नागिरी:- मागील 24 तासात 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 162 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासात नव्याने 18 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 230 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 162 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 60 हजार 325 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 11 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 766 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 330 झाली असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.97 टक्के आहे.









