जिल्ह्यात 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- मागील मागील 24 तासात 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 95 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 327 एवढीच आहे.  
 

मागील 24 तासात नव्याने 13 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 95 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 57 हजार 939 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 9 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 327 झाली असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.88 टक्के आहे