कारच्या धडकेत वेडसर प्रौढाचा मृत्यू 

रत्नागिरी:- शहरातील रहाटाघर समोर भरदिवसा वेडसर प्रौढाला अज्ञात कारने धडक दिली. यात त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 9 डिसेंबर रोजी दुपारी 1.40 ते 1.48 वा. सुमारास घडली. 

याप्रकरणी अज्ञात सफेद रंगाच्या कारचालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी हा अज्ञात वेडसर प्रौढ (55) रहाटाघर परिसरात फिरत होता. त्यावेळी  स्टँड ते मिरकरवाडा जाणाऱ्या अज्ञात सफेद रंगाच्या कारने त्याला धडक देऊन पळ काढला. धडकेमुळे त्या प्रौढाला लहान-मोठ्या दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.