10 नोव्हेंबरला लिलाव प्रक्रिया व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे
रत्नागिरी:- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा 10 नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र कोविडच्या संकटामुळे हा लिलाव प्रत्यक्ष जागेवर येऊन न करता मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरंसींद्वारे होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली. जे बोलीधारक या लिलावात भाग घेणार आहेत, तेदेखील या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित असल्याची माहिती आहे.
सात मालमत्तांचा होणार लिलाव
एकूण सात मालमत्तांचा लिलाव होणार आहे.
कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम कासकर याचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके आहे. या गावात त्याचा बंगला , आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहर अशा सात ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता आहेत. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 10 नोव्हेंबर रोजी या मालमत्तांचा लिलाव होणार आहे, मात्र कोविडच्या संकटामुळे हा लिलाव प्रत्यक्ष जागेवर येऊन न करता मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरंशीद्वारे होणार आहे. या पार्श्वभूमीवर लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्याना संबंधित मालमत्ता दाखवणे गरजेचे असल्याने केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे अधिकाऱ्यांनी खेड येथे येऊन या मालमत्तेची पाहणी केली.
लिलावासाठी चांगला प्रतिसाद
दरम्यान या लिलावासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण दाऊदची मालमत्ता घेण्यासाठी इच्छूक असल्याचं अधिकऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी ही मालमत्ता विक्री करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वासही अधिकऱ्यांनी व्यक्त केला आहे.