रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 13 बाधित रुग्ण सापडले आहेत. तर या कालावधीत तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. चोवीस तासात 411 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ही मोठी दिलासादायक बाब आहे.
सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 411 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 401 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोमवारी 37 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आता पर्यंत 8 हजार 405 रुग्णांपैकी 7 हजार 798 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.63 टक्के आहे.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात तीन रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 316 बळी गेले आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर 3.75 टक्के इतका आहे.









