रत्नागिरी:- शहरातील भाग्यरती भवन-खालची आळी येथील वृद्ध महिलेला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. मधुमती मधूकर पंडित (वय ८०, रा. भाग्यरती खालची आळी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ११) पहाटे अडीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला मधुमती पंडीत यांना उलटी सारखे होऊन श्वास घेण्यास त्रास होवू लागला. बेशुद्ध अवस्थेत तिला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









