रत्नागिरी:- जिल्ह्यात आठ हजारांवर कोरोना बाधित सापडल्यानंतर आता रत्नागिरीकरांना संक्रमनाचे कमी आलेले प्रमाण दिलासा देणारे आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात केवळ 12 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मागील 24 तासात केवळ 12 बाधित रुग्ण सापडले आहेत. सापडलेले 12 रुग्णांपैकी दापोली 1, लांजा 1, चिपळूण 6 आणि रत्नागिरी तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. तसेच 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील एक मयत रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील व दुसरा मयत रुग्ण राजापूर तालुक्यातील आहे.
मागील चोवीस तासात 120 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत 44 हजार 648 हवा निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी 87 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आता पर्यंत 7 हजार 384 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.29 टक्के असून मृत्यूचे प्रमाण 3.69 टक्के आहे.









