Saturday, July 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिळ-पवारवाडी एसटी बस अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा

शिळ-पवारवाडी एसटी बस अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिळ-पवारवाडी स्टॉप येथे काल झालेल्या दोन एसटी अपघात प्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलीखान गुलाबखान पठाण (वय ३७, मुळ रा. धनगर तकली, ता. पुर्णा,जि. परभणी. सध्या रा. महालक्ष्मी, रत्नागिरी) असे संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी सातच्या सुमारास शिळ-पवारवाडी स्टॉप येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक पठाण हे एसटी (क्र. एमएच-१४ बीटी २२३१) ही भावेआडमहून सकाळी साडेपाच वाजता रत्नागिरीकडे येत असताना शिळ पवारवाडी रस्त्यावर त्यांचा गाडीवरिल ताबा सुटून बस समोरुन येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. या अपघातात स्वतः सह १२ महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. तर एसटीचे नुकसान झाले. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.