Monday, June 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेड-दापोली मार्गावर मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने खळबळ

खेड-दापोली मार्गावर मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने खळबळ

पोलिसांकडून तपास सुरू

खेड:- खेड-दापोली मार्गावर साखरोली गावच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी २१ जून रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान साखरोली पेट्रोल पंपाच्या पुढील वळणावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत मानवी अवशेष ताब्यात घेतले असून, अधिकृत पंचनामा पूर्ण केला आहे. सापडलेले हे अवशेष पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हे अवशेष स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, तसेच हा प्रकार घातपाताचा आहे की आत्महत्येशी संबंधित, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. साखरोली आणि परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.