रत्नागिरी:- मासेमारी बोटीवर सुतार काम करत असताना बोटीला होल पाडण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रिल पाना छातीला लागून वृद्ध जखमी झाला. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. चंद्रकांत यशवंत गोळपकर (वय ६०, रा. कासारवेली, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास रत्नागिरीतील परकार हॉस्पिटल येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत गोळपकर हे मासेमारी बोटीवर काम करत असताना बोटीला होल पाडण्याचा ड्रिल पाना अचानक उडून त्यांच्या छातीला लागला. ते बेशुद्ध झाले उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









