Sunday, May 24, 2026
spot_img
Home शैक्षणिक श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना...

श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्टच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, श्री भैरी भगवती मंदिर ट्रस्ट, वाटद यांच्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते श्री. उमेश संभाजी रहाटे यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

​या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या खालील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहित करण्यात आले. यामध्ये इयत्ता १० वी मधील शुभम संतोष रहाटे, राज प्रमोद रहाटे, श्रेयश चंद्रकांत रहाटे, आर्या राकेश रहाटे. तसेच इयत्ता १२ वी मधील यश प्रमोद रहाटे, निखिल संतोष रहाटे, अनघा राकेश रहाटे, गौरी कमलाकर रहाटे, तनिष्का राजेंद्र रहाटे यांना सन्मानित करण्यात आले.

​शैक्षणिक साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. विजय बळीराम रहाटे, श्री. अवधूत अंकुश रहाटे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सालाबादप्रमाणे याही वर्षी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या उत्साहात श्री सत्यनारायण महापूजा पार पडली. तसेच रात्रीच्या सत्रात ‘श्री कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ, वाटद’ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या बहुरंगी नमन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. या दुहेरी सोहळ्यामुळे वाटद परिसरात आनंदाचे वातावरण होते.