Wednesday, May 13, 2026
spot_img
Home संगमेश्वर देवरुखात वृद्धेची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या

देवरुखात वृद्धेची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील भायजेवाडी येथे एका ८० वर्षीय वृद्धेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत यमुना भिकू भायजे (वय ८० वर्षे) या ११ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास आपल्या खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्री त्यांनी घराच्या मागील बाजूला अंगणात जाऊन माचिसने स्वतःला पेटवून घेतले.

१२ मे रोजी पहाटे २.३० च्या सुमारास मयत महिलेचा मोठा मुलगा चंद्रकांत याने आईला जळताना पाहिले. त्यावेळी त्यांची हालचाल सुरू असल्याचे पाहून त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती पहाटे ५.१५ वाजता त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी बळीराम भिकू भायजे यांनी दिलेल्या खबरीवरून देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (आमृ. क्रमांक १५/२०२६) म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.