Sunday, June 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी शहर परिसरात मद्यपान करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी बीच, मारुती मंदिर आणि भगवती बंदर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिझवान जमालुद्दीन बोरकर (वय २२, रा. एस. के. आर कंपनी मिरकरवाडा, रत्नागिरी. मुळ कातळी, सागवे, राजापूर), हर्षल आनंद शिंदे (वय २०, रा. गोडावून स्टॉप, विनम्र नगर नाचणे, रत्नागिरी) व अविनाश देवू सांबर (वय २८, रा. डहाणू, जि. पालघर. सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी मद्यपान करणाऱ्या संशयित तरुणांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १६ ते १७) दुपारी दीड ते रात्री आठच्या सुमारास मांडवी बीच, मारुती मंदिर, भगवती बंदर येथे निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे, प्रशांत पाटील, पोलिस हवालदार पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.