रत्नागिरी:- आंब्याच्या बागेत टॉवेल सारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या तरुणाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. महेश राधेशाम (वय ३३, मुळ ः रा. श्रीनगर लखीमपूर खेरी राज्य-उत्तर प्रदेश, सध्याः सांडेलावगण, पो. जयगड, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यापासून समिर रोहिदास रहाटे यांच्या आंबा बागेत मजुरीचे काम करण्यासाठी मृत महेश राधेशाम हा होता. दोन ते चार दिवस तो दारु पित होता. समिर रहाटे हे कराराने घेतलेल्या बागेत रखवालदार महेश राधेशाम याला फोन केला असता तो त्याने उचलला नाही म्हणून ते पहाण्यासाठी गेले असता महेश राधेशाम याने आंब्याच्या झाडाला टॉवेल सारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. तात्काळ त्याला उपचारासाठी वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









